जिल्ह्यात 24 तासात एकही मृत्यू नाही;  256 नवे कोरोनाबाधित

रत्नागिरी:- मागील 24 तासात 256 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना एकही मृत्यू झालेला नाही. 

नव्याने 256 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 71 हजार 49 इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या 256 पैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांपैकी 165 तर अँटीजेन चाचणी केलेल्यांपैकी 91 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 71 हजार 49 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 66 हजार 815 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 

24 तासात 316 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 
 जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये 1 हजार 73 जण उपचार घेत आहेत. कोरोना कोविड सेंटरमध्ये 413 मध्ये रुग्ण उपचार घेत आहेत.नव्याने एकही मृत्यू न झाल्याने मृत्युदर घटून 2.86 टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर मागील आठवड्यात 2.82 टक्के इतका होता.