जिल्ह्यात 322 नवे कोरोनाबाधित; एकूण मृत्यूसंख्या दोन हजारापार 

रत्नागिरी:- मागील 24 तासात 322 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा 2 हजार 4 इतका झाला आहे. 

नव्याने 322 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 79 हजारापार पोहचली आहे. नव्याने सापडलेल्या 322 पैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांपैकी 214 तर अँटीजेन चाचणी केलेल्यांपैकी 108 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 70 हजार 221 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.यातील 65 हजार 493 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 

24 तासात 176 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 
 जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये 1 हजार 126 जण उपचार घेत आहेत. कोरोना कोविड सेंटरमध्ये 697 मध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात नव्याने  8 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 8 रुग्णांच्या मृत्यूमुळे एकूण मृत्यूची संख्या 2 हजार 4 इतकी झाली आहे. नव्याने नोंद झालेल्या आठ मृत्यूपैकी 2 मृत्यू हे 24 तासातील तर 6 मृत्यू यापूर्वीचे आहेत. 

जिल्ह्याचा मृत्युदर मागील आठवड्यात 3.54 टक्के इतका होता. हा मृत्युदर या आठवड्यात घटून 2.85 टक्क्यांवर आला आहे. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 93. 27 टक्क्यांवर आहे. जिल्ह्यात लक्षण नसलेले 1 हजार 925 तर लक्षण असलेले 799 असे एकूण 2 हजार 724 जण उपचार घेत आहेत.