जिल्ह्यात 205 नवे कोरोनाबाधित; आठ रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. मागील 24 तासात 205 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांचा आकडा 1 हजार 996 इतका झाला आहे. 

नव्याने 205 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 69 हजार 899 रुग्ण सापडले आहेत.  24 तासात 190 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आता पर्यंत 65 हजार 317 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.