दिलासादायक; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट, 24 तासात अवघे 178 रुग्ण 

रत्नागिरी:-मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा जिल्ह्यातील प्रभाव कमी झाल्याचे चित्र आहे. मागील 24 तासात अवघे 178 तर त्यापूर्वीचे 49 असे 227 रुग्ण नव्याने सापडले आहेत. यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट घसरून 5.32 टक्क्यांवर आला आहे. 

मागील काही दिवस पॉझिटिव्ह रुग्णसंख्या नियमितपणे 500 च्या दरम्यानच होती. रविवारी आलेल्या अहवालात 4 हजार 771 चाचण्या करण्यात आल्या होत्या. रविवारी जिल्ह्यात 430 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र सोमवारी आलेल्या अहवालांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

नव्याने 227 रुग्ण सापडले होते. 24 तासात 178 रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणी केलेले 95 तर अँटीजेन चाचणी केलेले 83 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. नव्याने 227 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 64 हजार 209 झाली आहे. 

24 तासात 4 हजार 658 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत एकूण 4,06,796 कोरोना अहवाल अबाधित आले आहेत. याच कालावधीत 430 जण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 56 हजार 481 जण कोरोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 87.96% आहे. कित्येक दिवसानंतर जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आजपर्यंत 1 हजार 817 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.