सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्याप्रकरणी चौघांवर कारवाई

रत्नागिरी:- शहरातील चार दुकानांमध्ये कोरोना काळात तोंडाला मास्क न लावल्याप्रकरणी 4 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी 6.30 ते 7.40 वा. कालावधीत करण्यात आली. 

नदिम खान (28, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी), अशरफ खान (19, रा. कोकणनगर, रत्नागिरी), अक्षय नागवेकर (रा.कर्ला, रत्नागिरी) आणि बबलू राय (रा. सावळीस्टॉप, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असल्याचे माहित असतानाही सार्वजनिक ठिकाणी आपल्या तोंडाला मास्क न लावता हयगईचे कृत्य केले. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.