कोकण रेल्वे मार्गावर धावणार पश्चिम रेल्वेच्या चार साप्ताहिक गाड्या

रत्नागिरी:- राज्यात अनलॉकची मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर साप्ताहिक विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पूर्णतः आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, असे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हापा – मडगाव जं. – हापा साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (02908/02907) ही 30 जूनपासून दर बुधवारी धावणार आहे. बुधवारी रात्री 9:40 वाजता हापा येथून सुटेल. ती मडगावला दुसर्‍या दिवशी रात्री 10:20 वाजता पोचेल. तिचा परतीचा प्रवास मडगाव जंक्शन येथून दर शुक्रवारी 10:00 वाजता सुरु होईल. तीच दुसर्‍या दिवशी हापा येथे सकाळी पोचेल. भावनगर – कोचुवेली भावनगर साप्ताहिक विशेष (09260/09259) ही गाडी 2 जून पासून दर मंगळवारी सकाळी 10.0 10 वाजता भावनगरहून सुटेल. तिसर्‍या दिवशी ती 7:10 वाजता कोचुवेलीला पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास दर गुरुवारी दुपारी 1:45 वाजता सुरु होईल. तिसर्‍या दिवशी ती गाडी 12:25 वाजता भावनगरला पोहोचेल. पोरबंदर – कोचुवेली – पोरबंदर ही साप्ताहिक विशेष (09262)  गुरुवारी 1 जुलैपासून दर गुरुवारी सायंकाळी 6:40 वाजता पोरबंदरहून सुटेल. तिसर्‍या दिवशी ट्रेन कोचुवेलीला 6:00 वाजता पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास दर रविवारी रात्री 12:15 वाजता सुरु होईल. तिसर्‍या दिवशी ती सकाळी 7:25 वाजता पोरबंदरला पोहोचेल. इंदूर – कोचुवेली – इंदूर (03 3 322 / 0333311) ही साप्ताहिक विशेष इंदूर जंक्शन येथून सुटेल. 29 जूनपासून दर मंगळवारी रात्री 9:40 वाजता सुटेल. ती तिसर्‍या दिवशी ट्रेन कोचुवेलीला सायंकाळी 6:00 वाजता पोहोचेल. कोचुवेली – इंदूर जं. साप्ताहिक विशेष (09331) 2 जुलै पासून दर शुक्रवारी सकाळी 9.15 वाजता कोचुवेलीहून सुटेल. ती इंदूर जंक्शनला तिसर्‍या दिवशी पहाटे 4:40 वाजता पोेचेल. कोविडशी निगडीत सर्व नियमांचे पालन या गाड्यांमध्ये प्रवास करताना काटेकोरपणे करण्यात येणार आहे.