संगमेश्वर मधील त्या पाच गावातील रुग्ण ‘व्हीओसी’ बाधित

बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्यांवर भर 

रत्नागिरी:-कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यातून दिल्लीतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे निदान व्हीओसी (व्हेरिअंट ऑफ कर्न्सन) म्हणून झाले आहे. त्यामुळे संगमेश्‍वर तालुक्यातील त्या पाच गावात व्हीओसी बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्यांवर भर दिला आहे. सध्या कोणतेही भितीचे कारण नाही, असे एका पत्रकाद्वारे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात बाधित सापडत असल्यामुळे मागील तीन महिन्यात  डब्ल्यूजीएसचे नमुने दिल्लीतील लॅबला पाठविण्यात आले होते. त्याचे व्हीओसी (व्हेरिअंट ऑफ कर्न्सन/व्हीओआय व्हेरिंअट ऑफ इंट्रेस्ट) म्हणून निदान झाले आहे. पण त्याचे परिणाम सकारात्मक अथवा नकारात्मक होईल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.  डब्ल्यूजीएस हे भारतातील दहा लॅबमध्ये केले जाते. राज्यस्तरावरील आयडीएसपी युनिटकडून जिल्हास्तरावर काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविण्यास सांगितली आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये व्हीओसीच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची कोविड तपासणी करावी आणि पॉझिटीव्ह नमुने डब्ल्यूजीएसकडे पाठवावेत. त्या भागात इन्फ्लूएंझा लाइक इलनेस (आयएलआय) आणि सारी चेही आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनांनुसार चचाणी घ्यावी. लसीकरण स्थिती आणि लसीकरणानंतरची प्रकरणेही शोध घेतली पाहीजे. तसेच लसीच्या कार्यक्षमतेचे मुल्यांकन करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. पुन्हा कोविड संसर्गाच्या घटनांचा शोध घेण्यात येणार आहे. आरोग्यचे विशेष पथक नेमूणन जास्त नमुने एकत्रित करुन प्रयोगशाळेत पाठविण्यासंदर्भात पावले उचलण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावरुन या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. जिल्ह्याच पॉझिटीव्हीटी दर एप्रिलमध्ये 17.89 टक्के होता. हा पॉझिटीव्हीटी दर 8.73 आहे. खालील गोष्टींवर भर देण्यासाठी शासनस्तरावरुन आयडीएसपी युनिटला सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संगमेश्‍वर तालुक्यातील पाच गावांमध्ये (म्हाबळे, धाणमी, कसबा, नावडी व कोंडगाव) बाधित सापडत आहेत तेथील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सारीसह आयएलआय चे सर्व्हेक्षण. पुनःश्‍च कोविडचे लागण झालेले बाधित शोधणे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सर्व गोष्टींची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असे आवाहन पत्रकाद्वारे जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.