जिल्ह्यात 594 कोरोना पॉझिटिव्ह तर 13 मृत्यूंची नोंद

चोवीस तासात 493 तर यापूर्वीच्या 101 अशा एकूण 594 रुग्णांची नोंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 493 तर त्यापूर्वीचे 101 असे एकूण 594 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 294 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 199 तर यापूर्वीच्या 101 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 46 हजार 530 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 6 तर त्यापूर्वीचे 7 अशा 13 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 574 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 3. 38 टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात आज 11 तर आतापर्यंत 471 मृत्यू, चिपळूण 300, संगमेश्वर तालुक्यात 181, खेड तालुक्यात 151 मृत्यू झाले आहेत. सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात केवळ 13 झाले आहेत.

जिल्ह्यात  गुरुवारी 538, शुक्रवारी 683, शनिवारी 426, रविवारी 484, सोमवारी 488, मंगळवारी  655, बुधवारी 623 रुग्ण सापडले होते. नव्याने 594 रुग्ण सापडले  असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 418 पैकी 294 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 3 हजार 142 पैकी 199 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 46 हजार 530 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 5 हजार 560 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 493 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.