जिल्ह्यात 24 तासात 592 कोरोना बाधित रुग्ण 

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 592 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 488 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 104 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 44 हजार 658 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 15 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये आज 13 जणांचा मृत्यू झाला असून अगोदर मृत्यू झालेल्या 2 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 534 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर 3.43 टक्क्यांवर आहे. रत्नागिरी तालुक्यात आज 7 तर आतापर्यंत सर्वाधिक 450 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात गेल्या रविवारी 567 तर सोमवारी 429, मंगळवारी 567, बुधवारी 525, गुरुवारी 538, शुक्रवारी 683, शनिवारी 426, रविवारी 484 रुग्ण सापडले होते. नव्याने 592 रुग्ण सापडले  असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 116 पैकी 488 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 601 पैकी 104 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 44 हजार 658 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 3 हजार 717 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 592 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.