24 तासात 426 कोरोना बाधित; पॉझिटिव्हिटी रेट 11 टक्क्यांवर

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 426 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 228 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 198 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज आलेल्या अहवालांचा पॉझिटिव्हिटी रेट 11.27 टक्क्यांवर आला असून ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 43 हजार 378 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नव्याने झालेल्या मृत्यूपैकी सर्वाधिक 8 चिपळूण तालुक्यातील तर रत्नागिरी तालुक्यात 7 मृत्यूंची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 501 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 437 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 293, खेड 145, गुहागर 132, दापोली 123, संगमेश्वर 172, लांजा 79, राजापूर 108 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.46% आहे

मागील चोवीस तासात एकूण 3 हजार 779 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 426 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी रत्नागिरी तालुक्यात 128 तर संगमेश्वर 25, चिपळूण 86, गुहागर  30, खेड 32, दापोली 73, मंडणगड 17, लांजा 6 आणि राजापूर तालुक्यात 27 रुग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यात गेल्या बुधवारी 610, गुरुवारी 389 तर शुक्रवारी 590, शनिवारी 582, रविवारी 567 तर सोमवारी 429, मंगळवारी 567, बुधवारी 525, गुरुवारी 538 तर शुक्रवारी 693 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. शनिवारी नव्याने 426 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1 हजार 958 पैकी 228 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 821 पैकी 198 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.