जिल्ह्यात खतांच्या विक्रीवर भरारी पथकामार्फत करडी नजर 

रत्नागिरी:- खरीप हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यासाठी युरियाचा एकूण 8 हजार मे.टन इतक्या खताचा पुरवठा झाला आहे. रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किंमतीपेक्षा कुणी जास्त किंमतीने खत विक्री होवू नये यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राना प्रत्यक्ष भेटी देण्यावर जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकामार्फत नजर ठेवली जात आहे.  
 

कुणी विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्याकडे तक्रार करू शकता किंवा आपल्याकडे तक्रार करावी, असे आवाहन अधिकारी शेंडये यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात युरीया खताची मोठी मागणी आहे. कृषी सेवा केंद्रात जर जास्त दराने खत विक्री करत असतील तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आहेत. मात्र त्यासाठी लेखी तकार येणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात सर्व खत विकी केंद्र, ग्रामीण सोसायट्यांपर्यंत खत पुरवठा सुरू झालेला आहे. त्याठिकाणहून शेतकऱ्यांना खताची विकी सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत 8 हजार मे.टन इतका खतसाठा उपलब्ध झाल्याचे जि.प.कृषी अधिकारी अजय शेंड्ये यांनी सांगितले.  
 

खत विकी केंद्राबाहेर खतांचे दरपत्रक लावण्याच्या सुचनाही सर्व विकेत्यांना करण्यात आल्या आहेत. खते विकत घेत असताना त्याची पावती घेणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे. जेणेकरून होणारी फसगत टळण्यास मदत होणार असल्याचे शेंड्ये यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पाप्त झालेले खताची मूळ रकमेनुसारच खतविक्री करण्याच्या सक्त सूचना जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अजय शेंड्ये यांनी दिल्या आहेत. छपाई किंमतीपेक्षा जादा किंमत आकारता येत नाही. रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किंमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराची खते (जुने दर छपाई असलेल्या बॅगा) जुन्याच दराने शेतकऱ्यांना विकणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे.  

जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, बियाणी, कीटकनाशके गुणवत्ता भावात मिळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये पथकपमुख-जि.प.कृषी अधिकारी अजय शेंडे यांच्या नेतृत्वाखाली खतविकी सेवा केंद्र व कृषी विषयक सेवा केंद्रांना भेटी देवून तेथील तपासणी केली जात आहे. खतविकी बाबत होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सक्त सूचनाही दिल्या जात आहेत.