रत्नागिरी शहरात दोन व्यापाऱ्यांवर कारवाई

रत्नागिरी:– कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असल्याचे माहित असूनही आपली दुकाने उघडल्या प्रकरणी 2 दुकानदारांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 4 जुन रोजी मुरुगवाडा आणि आठवडाबाजार येथे करण्यात आली.

उदय मयेकर (63,रा. मुरुगवाडा, रत्नागिरी ),जयंत पंडित (50,रा. मांडवी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांची नावे आहेत.या दोघांनी ब्रेक द चेन या लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत आपली दुकाने उघडली होती.अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.