जिल्ह्यात 24 तासात 610 जण कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 610 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. प्रलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात सहाशेपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी गुरुवार पासून जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 655 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 38 हजार 72 झाली आहे. 

मागील 24 तासात 8 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने झालेल्या 8 मृत्यू पैकी रत्नागिरी 1, चिपळूण 1, गुहागर 1, लांजा 1 , खेड 2, दापोली 1 आणि राजापूर तालुक्यात एका मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 259 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 363 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 244, खेड 127, गुहागर 90, दापोली 110, संगमेश्वर 153, लांजा 68, राजापूर 92 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.30% आहे.

जिल्ह्यात बुधवारी 635, गुरुवारी 437, शुक्रवारी 416, शनिवारी 494, रविवारी 508 तर सोमवारी 395, मंगळवारी 655 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. बुधवारी पुन्हा 610 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1 हजार 714 पैकी 423 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 577 पैकी 177 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.