जिल्ह्यात लॉकडाऊन काळात बँकांच्या वेळेत बदल

रत्नागिरी:-जिल्ह्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन यशस्वी करतानाच शेतकर्‍यांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आदेशात सुधारणा करण्यात आले आहे. यानुसार पतसंस्था, बँका सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 पर्यंत चालू ठेवणार असल्याचे नवीन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

गुरूवार दिनांक 3 जून ते 9 जून 2021 पर्यंत कडक लॉकडाऊन सुरू होत आहे. मात्र या कालावधीत सहकारी , सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खाजगी बँका व सहकारी बँका यांचेशी संबंधित फक्त शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने पिक कर्जाचे खत, बि- बियाणे, शेती अवजारे यांची दुकाने, गॅस एजन्सीज, पेट्रोलपंप, मेडीकल यांचे रोख व्यवहार इ. कामकाज, एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटर्स ही कामे कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या कालावधीत चालू राहतील. तसेच सदर बँकांचे उर्वरीत सर्व कामकाज पुर्णपणे बंद राहील. सदर ठिकाणी गर्दी होणार नाही तसेच कोरोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील असे नवीन आदेशात नमूद करण्यात आले आहे.