जिल्ह्यात 24 तासात तब्बल 655 पॉझिटीव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 655 आणि प्रलंबित 368 अशा एकूण 1023 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 3 जूनपासून नियोजित लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्याप्रमाणात रुग्णसंख्येची नोंद झाल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. प्रलंबित 368 आणि मागील 24 तासात 655 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 37 हजार 462 झाली आहे. 

मागील 24 तासात 7 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 247 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.32% आहेे. मागील 24 तासात 2435 तर प्रलंबित 670 निगेटिव्ह अहवाल आले असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 1,72,126 निगेटिव्ह अहवालांची नोंद आहे. 

जिल्ह्यात मंगळवारी 315, बुधवारी 635, गुरुवारी 437, शुक्रवारी 416, शनिवारी 494, रविवारी 508 तर सोमवारी 395 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. जिल्ह्यात 3925 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आज 507 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 32,290 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 86.19% आहे.