सहा तासात हजार भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन 

रत्नागिरी:- कोरोनामुळे मंदिरांसह पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आल्यामुळे संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळ्यातील श्रींचे दर्शन ऑनलाईन करण्यात आले होते. विजेचा खेळखंडोबा यासह नेटचा अभाव यामुळे संकष्टीच्या दिवशी सहा तास चाललेल्या या उपक्रमात 1 हजारहून अधिक लोकांनी श्रींचे दर्शन घेतले.

मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाटेचा प्रादुर्भाव राज्यभरात जाणवू लागला. सार्वजनिक ठिकाणची गर्दी नियंत्रीत करण्यासाठी शासनाने मंदिरे, पर्यटनस्थळे बंद केली. गेले तिन महिने पूर्णतः संचारबंदी सुरु आहे. बंदीमुळे एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाणे होत नाही. या परिस्थिती गेल्या तिन महिन्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीला अनेक भक्तजणं श्रींच्या दर्शनापासून पारखेच राहीले आहेत. गणपतीपुळेतील श्रींच्या दर्शनाला पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेकजणं दाखल होतात. कोरोनातील परिस्थिीतीमुळे लोकांना दर्शनाची आसच राहीली आहे. शनिवारी (ता. 29) संकष्टीनिमित्त गणपतीपुळे देवस्थानतर्फे ऑनलाईन दर्शनाची सुविधा ठेवली होती. पहाटे नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा करण्यात आली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गणपतीपुळे देवस्थानच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन दर्शनाची सुविधा दिली गेली. वीजेचा खेळखंडोबा, मोबाईल नेटचा गोंधळ यामुळे अडचणी येत होत्या. दिवसभरात सहा तास ही सुविधा भक्तगणांना दिली गेली. त्यात एक हजारहून अधिक लोकांनी दर्शन घेतले होते.