नियमबाह्यपणे दुकान उघडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- कोरोना संसर्ग पसरण्याचा संभव असल्याचे माहित असून देखील आपले दुकान नियमबाह्यपणे उघडून मालाची विक्री केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शनिवार 29 मे रोजी सकाळी 9.30 वा.सुमारास गाडीतळ येथे करण्यात आली.

अंकूश सुरेश नारकर (रा.आदित्य अपार्टमेंट आरोग्य मंदिर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे.शनिवारी सकाळी त्याने शासनाने जारी केलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करत गाडीतळ येथील आपले उत्सव स्विट्स नावाचे दुकान उघडले होते.अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.