शिरगांवचे माजी सरपंच सुरेंद्र नार्वेकर यांचे निधन

रत्नागिरी:- तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगांवचे माजी सरपंच,सुमित्रा पतपेढीचे चेअरमन आणि विविध क्षेत्रात सक्रिय असणारे सुरेंद्र दत्तात्रय नार्वेकर यांचे कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे.

त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच असताना त्यांनी गावात विकासकामे केल्यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय सरपंच म्हणून प्रसिध्दीस आले होते. सुरेंद्र नार्वेकर यांच्या मनमिळावू आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या कार्यपद्धतीमुळे तालुक्यात आपल्या कामाची छाप सोडली होती. सुरेंद्र नार्वेकर यांच्या अचानक जाण्याने अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा शिरगाव येथील समशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.