वेळेनंतरही दुकाने उघडी ठेवणाऱ्या बाजारपेठेतील चार दुकानदारांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका असतानाही आपली दुकाने निर्धारित वेळेनंतरही उघडी ठेवल्याप्रकरणी चार दुकानदारांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई  शनिवार 22 मे रोजी दुपारी  12.30 ते सायंकाळी 7.30 वा कालावधीत बाजारपेठेत करण्यात आली.

अमोल सुर्वे (42,रा.खालची आळी,रत्नागिरी), नवाज फजलानी (21,रा.रत्नागिरी), बी.डी.धरमाप्पा (27,रा.गाडीतळ,रत्नागिरी) आणि दर्शन मुळ्ये (26,रा.बागवे हाउस,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांची नावे आहेत.त्यांनी आपल्या मालकीची किराणा स्टोअर्स, भांडी स्टोअर्स, अय्यंगार केक शॉप आणि हॉटेल कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका असताना तसेच निर्धारित वेळेनंतरही उघडी ठेवल्याने शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.