सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार; रत्नागिरीत पेट्रोलचे दर शंभरी पार

रत्नागिरी:- रत्नागिरीत प्रथमच पेट्रोलच्या दराने विक्रमी दर गाठला आहे. पेट्रोलचे दर प्रथमच शंभरी पार पोहचले आहेत. पेट्रोलच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांचे पुरते हाल होण्याची चिन्हे आहेत. आधीच लॉकडॉऊनमुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या सर्वसामान्यांना पेट्रोलसह डिझेल दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. 

गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने भाव वाढ होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या भावात शुक्रवारी पुन्हा एकदा वाढ होऊन पेट्रोलचे भाव १०० रुपयांच्या पुढे पोहोचले आहे. या भाववाढीने पेट्रोल १००.२३ रुपये प्रति लिटर झाले आहे तर डिझेलचे भाव देखील ९० रुपयांच्या पुढे जाऊन पोहचले आहेत.