पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या 

कुवारबाव येथील घटनेने एकच खळबळ; आत्महत्यचे  कारण अस्पष्ट 

रत्नागिरी:- कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करुन स्वत:लाही संपवून घेतल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.  शहरानजीक कुवारबाव येथील अनुराधा अपार्टमेंटमध्ये हि घटना घडली. मंगळवारी सकाळी हि घटना उघड  होताच परिसरात खळबळ उडाली.

मुळचे नाशिक येथील असलेले रोहित राजेंद्र चव्हाण (२९), पत्नी पूजा रोहित चव्हाण (२८) हे दांम्पत्य सुमारे १२ वर्षांचपुर्वी रत्नागिरीत राहायला आले होते. दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यामुळे नाशिक येथील त्यांच्या काही निवडक नातेवाईकांच्या ते संपर्कात होते. दोघेही रत्नागिरीत आल्यानंतर पत्नी पूजा चव्हाण एका चॉकलेट कंपनीत कामाला जात होती.  तर रोहित खाजगी नोकरी करत होता. मात्र लॉकडाऊनमुळे सध्या तो घरीच होता. तर त्यांना दहा वर्षाची एक मुलगी आहे.सोमवारी रात्री नेहमी प्रमाणे हे कुटुंबिय नेहमी प्रमाणे जेवण करुन झोपी गेले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुलगी पाणी  पिण्यासाठी उठली होती. तेव्हा रोहितेने तीला ‘सकाळी दरवाजा उघडला नाही, तर शेजारच्या आजोबांना सांग’ असे सांगितले. मात्र लहान असलेल्या त्या चिमूडीला याचा अर्थ समजला नाही. त्यानंतर ती झोपी गेली.

पहाटेच्या सुमारास रोहितने ओढणीच्या सहाय्याने पत्नी पूजाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने पख्यांला गळफास लावून स्वत:ही आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे मुलगी उठल्यानंतर तिने दरवाजा ठोठवला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने रात्री वाडिलांनी सांगितल्या प्रमाणे तीने शेजारच्या आजोबांना  यांची माहिती दिली.
 

यावेळी शेजारी राहणारे नागरिक एकत्र आले. खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने अखेर तो तोडण्यात आला. यावेळी समोरील दृष्य पाहून सर्वांचाच गोंधळ उडाला. पुजा चव्हाण बेडवर निपचित पडलेली होती. तर रोहित गळफास लावलेल्या स्थितीत असल्याने या घटनेची माहिती शेजारी राहणार्या व्यक्तींनी शहर पोलीसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरिक्षक अनिल लाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज भोसले, कुवारबावचे बिटअंमलदार  संतोष गायकवाड, अवधूत सुर्वे, श्री. बगड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेहांचा पंचानामा करण्यात आला. त्यानंतर ते शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

पंचनामा करताना घटनास्थळी पोलीसांना रोहितने लिहिलेली एक  चिट्ठी आढळली आहे. त्यामध्ये नेमके काय लिहिले आहे. हे पोलीसांच्या  तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र कौटुंबिक वादातून रोहितने पत्नीची हत्याकरुन स्वत:ला संपविल्याचे समजते.दुपारी पोलीसांनी रोहित व पूजाच्या नाशिक येथील नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. रात्री उशिरा नातेवाईक रत्नागिरीत दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र पत्नीची हत्या करुन स्वत:ला संपविण्याचा टोकाचा निर्णय रोहितने का घेतला ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.