नगरसेवक विकास पाटील यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 8 झाला प्रकाशमान

रत्नागिरी:-तोक्ते चक्रीवादळाचा रत्नगिरी शहराला मोठा फटका बसला. अनेक भागात झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये देखील वीज खांबावर झाड पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. मात्र, नगरसेवक विकास पाटील महावितरण अधिकाऱ्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रभागातील वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.

रत्नागिरी शहरात वादळाचा मोठा प्रभाव दिसून आला. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे विजेचे खांब, झाड कोसळले.शहर अनेक तास अंधारात बुडाले. प्रभाग
क्रमांक 8 मधील चर्च रोड व जेल हा भाग मागील तीन दिवस अंधारात होता महावितरणच्या पोलवर मोठा वृक्ष पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

या समस्येची येथील नगरसेवक विकास पाटील यांनी दाखल घेत महावितरण अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला. नगरसेवक विकास पाटील व प्रभागातील कार्यर्कत्यांनी महावितरण अधिकारी श्री. बेले आणि श्री. डांगे आणि श्री. मोडक तसेच महावितरणचे कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून प्रभाग आठ मधील वीज पुरवठा युद्ध पातळीवर सुरू करून घेतला. वीज पुरवठा सुरू केल्या ळ बद्दल तेथील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले तसेच नगरसेवक पाटील यांचे आभार मानले.