दिलासादायक; जिल्ह्यात 24 तासात 259 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 259 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 202 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 57 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 728 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवे 259 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 30 हजार 595 झाली आहे.  

जिल्ह्यात शुक्रवारी 512, शनिवारी 502, रविवारी 486 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 259 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 202 रुग्ण आरटीपीसीआर तर 57 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 30 हजार 595 वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित प्रमाण 17.13% आहे.

मागील 24 तासात 728 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 728 जणांपैकी 526 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 224 पैकी 167 निगेटिव्ह आले आहेत. आज जिल्ह्यात तब्बल 14 मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 929 जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर 3.03% आहे.