रुग्णसंख्येत वाढ; जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 622 नवे रुग्ण

जिल्ह्यात आज तब्बल 29 मृत्यूंची नोंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णख्येत पुन्हा वाढ झाली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 622 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील तब्बल 196 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 306 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. नवे 622 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 27 हजार 893 झाली आहे. आज जिल्ह्यात तब्बल 29 मृत्यूंची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी 310 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मंगळवारी रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 622 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 196 रुग्ण आरटीपीसीआर तर 306 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 27 हजार 893 वर जाऊन पोहचली आहे. 

मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 29 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 844 इतकी आहे. रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक 15 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.02 % आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर चिंताजनक आहे. 

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 622 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 362, दापोली 12, खेड 14, गुहागर 27, चिपळूण 89, संगमेश्वर 46, राजापूर 16 आणि लांजा तालुक्यात 56 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 16.73% आहे.