बाळ माने यांचे पक्षातील अस्तित्व दुर्बीण लावून शोधण्याची वेळ: गजानन पाटील

रत्नागिरी:- माजी आमदार  बाळ माने यांचे पक्षातील अस्तित्व कुठे आहे? हे दुर्बीण लावून शोधण्याची वेळ आली आहे. त्यांचे राजकिय अस्तित्व संपल्याने पक्षानेही त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला केले. याचे नैराश्येतून  ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्यावर नाहक खालच्या पातळीवर जावून टिका करत आहेत. आता म्हणाव बस्स करा. अन्यथा शिवसैनिक पेटून उटला तर बाळ मानेंना पळता भूई थोडी करु  असा इशार शिवसेनेचे रत्नागिरी तालुका संघटक तथा पंचायत समितीचे सदस्य गजानन पाटील यांनी पत्रकार परिषेदेत दिला.

रविवारी झूम अँपपद्वारे श्री. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सर्व यंत्रणा कामत व्यस्त आहे. ना. सामंत या सर्व यंत्रणांना पाठबळ देवून कोरोना महामारीचा सामना करत आहेत. अशा स्थितीत सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. राजकारण करण्यासाठी निवडणूका आहेत. मात्र बाळ माने कोरोना स्थितीतही राजकार करण्यात गुंतले आहेत. ते ना. सामंत यांच्यावर नाहक  टिका करत आहेत. 

माहिती कार्यालयाला दिलेल्या कॅमेऱ्याच्या उद्घाटन सोहळयात ना. सामंतांनी जिल्हाधिकार्यांसह खासदारांचा फोटो काढला तर बिघडले कुठे ? असा प्रश्न श्री. पाटील यांनी उपस्थित केला आहे. ना.सामंत चारवेळा निवडणून आले आहेत. जनतेचा आशिर्वाद त्यांच्या पाठिशी  आहे. सध्या १८ सदस्य असलेल्या मच्छिमार सोसायटीत निडवणूक जिंकता येत नसलेल्या बाळ माने यांनी ना.सामंत यांच्यावर टिका करणे हे हस्यास्पद असल्याचे श्री.पाटील म्हणाले.

स्वत:चे काम असले कि सामंत चालतात. काम झाले कि यांची टिका सुरु. मात्र जनतेला सामंत काय आहेत. हे माहित आहे. त्यामुळेच त्यांच्या लाखाचे मताधिक्य मिळतेय. बाळ माने यांचा ग्रामीण भागाशी संपर्क राहिलेला नाही. प्रसिद्धीच्या माध्यमातून चर्चेत रहाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ना.सांमत यांच्यावर टिका केली तरच आपल्याला कोण तरी विचारेल. या मानसिकतेतून बाळ माने टिका करत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

बाळ मानेंमध्ये हिमंत असेल तर त्यांनी यापुढील विधानसभा निवडणूक लढवावी. ना.सामंत शिवसैनिकांच्या जोरावर त्यांचे डिपॉझिट जप्त करायला  लावतील. तर साधा शिवसैनिकही त्यांचा ग्रामपंचायत मध्ये पराभव करेल अशी खिल्लीही श्री.पाटील यांनी उडविली.