रत्नागिरी एमआयडीसीत रस्त्यावर सापडला तरुणाचा मृतदेह; तपास सुरू

रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी येथे रस्त्यानजिक तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला, घातपात झाला की अन्य कशाने मृत्यू झाला याबाबत ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत. 
 

ऋषिकेश बेंद्रे असे तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यालगत या तरुणाचा मृतदेह आढळून आला. एमआयडीसी येथील एका कंपनीत हा तरुण कामाला आहे. या तरुणाच्या केवळ गुडघ्याला दुखापत असून अन्य कुठेही जखम नाही. यामुळे या तरुणाचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.