मंडणगड तालुक्यातील विन्हे येथून पाच किलो गांजासह दोघांना बेड्या

रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील विन्हे येथून पाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजासह हातभट्टीची, दारू, देशी व विदेशी दारू असा 1 लाख 24 हजार किमतीचा मुद्देमालासह दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

कोविडच्या अनुषंगाने गस्त घालत असताना मंडणगड येथील विन्हे गावी गांजा या अंमली पदार्थासह देशी, विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि मंडणगड पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाईची केली.

या कारवाई 1 लाख 15 हजार 560 किमीतचा 5 किलो 778 ग्रॅम गांजा. तसचे 1 हजार 850 रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू, 6 हजार 128 रुपयाची देशी व विदेशी दारू, एक इलेक्ट्रिकल वजन काटा, असा 1 लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अजित अरविंद घोरपडे (वय 22), अरविद रामचंद्र घोरपडे या दोघांना (रा. विन्हे गुरवावाडी) अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम 8 (क), 20 (ब) 29, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत वराळे, पोलिस हवालदार मिलिंद कदम, शांताराम झोरे, सुभाष भागणे, नितीन डोमणे, संजय जाधव, अमोल भोसले, बाळू पाललकर, मंडणगडेच पोलिस अधिकारी व कर्मचारी या पथकाने कारवाई केली.