जिल्ह्यात सहा ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार: ना. सामंत

रत्नागिरी:-कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण आहे. जिल्ह्यात सहा ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येणार आहेत. यासाठी 90 लाखांचा निधी मंजूर आहे. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णाल, कामथे, कळंबणी, राजापूर, दापोली शहरात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रुग्णांना सुविधा देण्यासाठी बेड वाढविण्यात येत आहेत. 10 जादा व्हॅन्टिलेटर घेणार येणार आहेत. 28 मेट्रिक टन ऑक्सिजन आता आपल्याकडे उपलब्ध आहे अशी माहिती ना. सामंत यांनी दिली.

जिल्ह्यात लसीकरण सुरू असून पाच हजार डोस आले असून आणखी पाच हजार येणार आहे. आतापर्यंत 1 लाख 19 हजार 083 लसीकरण झाले, 1 लाख 02 हजार 771 जणांना पहिला डोस तर 16 हजार 312 लोकांना दुसरा डोस दिली आहे. रेमडिसिव्हर 100 इंजेक्शन आहेत. जादा मागविण्यात आली आहेत. संचारबंदीच्या काळात गरजूंना मदत व्हावी, यासाठी योग्य नियोजन केले आहे. सुमारे 10 हजार 992 रिक्षाचालक परवानाधारक , ज्येष्ठ कलावंत, संजय गांधी निराधार योजना यांचा आढावा घेऊन त्यांना मदत देण्याच्यादृष्टाने हालचाली सुरू असल्याचे ना. सामंत म्हणाले.