कोरोनाचा कहर; सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात 248 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असताना सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी 251 रुग्ण सापडले असताना 24 तासात जिल्ह्यात तब्बल 248 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 251 पैकी 194 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 54 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. मागील चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून 134 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा स्फोटच झाला. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 248 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 हजार 519 वर जाऊन पोहचली आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात 194  रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 54 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 795 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 105844 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

चोवीस तासात 134 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10 हजार 884 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 86.93 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने 2 रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 391 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.12 % आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 248 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 75, दापोली 15, खेड 21, गुहागर 31, चिपळूण 32, संगमेश्वर 46, मंडणगड 10, राजापूर 7 आणि लांजा तालुक्यात 11 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 10.46% आहे.