रत्नागिरी पोलिस दला करीता नवीन गाड्या उपलब्ध झाल्या

43

रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती कडून मिळालेल्या सुमारे 1 कोटी 67 लाखांतुन पोलिस दलाकरीता 11बोलेरो गाड्या व 25 मोटार सायकल विकत घेण्यात आले,,रत्नागिरी येथील प्रसिद्ध नाईक मोटर्स चे संचालक नजीर नाईक यांनी बोलेरो गाड्यांच्या चाव्या पोलिस अधीक्षक डॉ,मोहीत कुमार गर्ग यांच्या सुपुर्द केल्या,या प्रसंगी होम डीवायएसपी शिवाजी पाटील, वरिष्ठ पत्रकार अलिमियां काझी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कलेकर,सागर खरे आदी उपस्थित होते, रत्नागिरी पोलिस दला करीता नवीन गाड्या उपलब्ध झाल्या बद्दल पोलिस अधीक्षक डॉ मोहीत कुमार गर्ग यांनी समाधान व्यक्त केले, ज्या पोलिस स्टेशन च्या गाड्या खराब झाल्या आहेत त्याची तपासणी व खात्री करून लवकरच त्यांना नवीन गाड्या दिल्या जातील असे डॉ गर्ग म्हणाले,,,याच बरोबर पोलिस विभाग अधिक सक्षम होणार असुन जनतेची सेवा अधिक तत्परतेने होईल असा विश्वास ही डॉ,गर्ग यांनी व्यक्त केला आहे, जिल्हा नियोजन समिती कडून पोलिस दलाकरीता गाड्या व मोटार सायकल खरेदी करीता निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने डॉ,गर्ग यांनी पालकमंत्री ना,अनील परब, खासदार,आमदार, जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा व सर्व सभासदांचे आभार मानले आहेत,,,