जिल्ह्यात 24 तासात 132  कोरोना बाधित रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. मागील 24 तासात जिल्ह्यात 132 नवे पॉझिटिव्ह रुग्ण  सापडले आहेत. सापडलेल्या 132 पैकी 113 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 19 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत.  मागील काही दिवसांपासून वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. 

पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक असून सोमवारी जिल्ह्यात 132 नव्या रुग्णांची भर पडली. रविवारी जिल्ह्यात 60 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 11 हजार 570 वर जाऊन पोहचली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात 113 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 19 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

मागील 24 तासात जिल्ह्यात दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 380 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मागील 24 तासात 687 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 1 लाख 2 हजार 913 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 24 तासात 54 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता पर्यंत 10 हजार 410 जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 89.97 टक्के आहे.