जिल्ह्यात 24 तासात 46 कोरोना बाधित रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 46 नवे रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. 46 पैकी 21 जण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 25 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. शनिवारी जिल्ह्यात 116 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते तर रविवारी 46 रुग्ण सापडले असून दोन दिवसात एकूण 162 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक असून शनिवारी जिल्ह्यात 116 नव्या रुग्णांची भर पडली होती. तर रविवारी 46 नवे रुग्ण सापडले. यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,779 वर जाऊन पोहचली आहे. मागील चोवीस तासात 693 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 97 हजार 257 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 17 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 968 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा बळी गेला नसूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 372  इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 92.47 टक्के आहे.

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाचे संक्रमण झाले आहे. नव्याने सापडलेल्या 46 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 14, खेड 1, चिपळूण 18, मंडणगड 2, राजापूर 6, लांजा 1 आणि संगमेश्वर तालुक्यात 4 रुग्ण सापडले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 9.93% आहे.