अज्ञात कारणातून प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- अज्ञात कारणातून घराच्या छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी 7.55 वा.सुमारास मृत्यू झाला.याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अन्वर महंमद काळसेकर (48,रा.सिध्दीविनायक नगर गोडबोले स्टॉप,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.बुधवार 24 मार्च रोजी दुपारी 3.15 ते 3.45 वा.कालावधीत घरात कोणीही नसताना अन्वर काळसेकर यांनी छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.तेव्हड्यात त्यांचा मुलगा घरी आल्याने त्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू उपचारांदरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.