चिंताजनक; जिल्ह्यात दोन दिवसात कोरोनाचे शंभर रुग्ण

रत्नागिरी:- मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असताना रत्नगिरी जिल्ह्यात देखील कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसात जिल्हयात 102 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. 

जिल्ह्यात शनिवारी 47 तर रविवारी तब्बल 55 पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा आकडा दर दिवशी वाढतच आहे. रविवारी 55 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने या चिंतेत भर पडली आहे. 

रविवारी सापडलेल्या 55 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरीत 6, दापोली 1, खेड 10, गुहागर 3, चिपळूण 20, संगमेश्वर 2, लांजा 2 आणी राजापूर तालुक्यात 11 रुग्ण सापडले आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 420 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असुन मागील 24 तासात 482 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील 24 तासात 20 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 9819 रुग्ण बरे झाले आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर 94.22 टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 371 जणांचा मृत्यू झाला आहे.