24 तासात जिल्ह्यात 20 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 371 वर पोचली आहे. 24 तासात 650 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मागील 24 तासात नव्याने 20 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 318 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 650 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 90 हजार 825 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 19 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 791 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 371  इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.89टक्के आहे.

नव्याने सापडलेल्या 20 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 9, दापोली 2, खेड 4, चिपळूण 4 आणि लांजा तालुक्यात 1 रुग्ण सापडला आहे.