गहाळ झालेल्या मोबाईलचे कॉल रेकॉर्डवरून होणार सत्याचा उलगडा

 दीक्षा इंगोले आत्महत्या की हत्या प्रकरण 

रत्नागिरीः– भगवती किल्ल्या नजिकच्या बागेजवळील कड्यावरुन कोसळून मृत्यू झालेल्या दिक्षा मोहन इंगोले हिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट  झालेले नाही. दिक्षाच्या गहाळ झालेल्या मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्ड शहर पोलीसांना मागविले आहे. त्यातूनच दिक्षाच्या मृत्यूच्या कारणाचा उलगडा होणार आहे. तर घटनास्थळी संशयास्पद वस्तू, पूरावे मिळतात का? हे पाहण्यासाठी शहर पोलीसांनी घटनास्थळाचा दुसऱ्यांदा सर्च केला आहे. मात्र तेथे पोलीसांच्या हाती काहिही लागलेले नाही.

सोमवारी सायंकाळी दिक्षाचा मृतदेह स्थानिकांना आढळला होता. त्यानंतर पोलीसांना तरुणीची ओळख पटविण्यात यश आले होते. दुसऱ्या दिवशी दिक्षाचा मृतदहे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. अभ्यासात हुशार असलेल्या दिक्षाचा अशा प्रकारे मृत्यू कसा झाला असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिक्षा मोबाईल वापरत होती. परंतु मृतदेहाच्या परिसरात कोठेहि मोबाईल पोलीसांना आढळलेला नाही.  त्यामुळे दिक्षाचे कॉल रेकॉर्ड पोलीसांनी मागविले आहेत. आज दिक्षाच्या मोबाईलची कॉल लिस्ट पोलीसांना मिळण्याची शक्यता असून त्यातून काही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

सोमवारी दुपारी घराबाहेर पडलेली दिक्षा सायंकाळपर्यत घरी आली नव्हती. मात्र दिक्षा कोणते कारण सांगून घराबाहेर पडली होती यांची माहितीही अद्याप पोलिसांनना मिळालेली नाही. त्यामुळे आता कॉल रेकॉर्डवरच दिक्षाच्या  मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.