दुचाकी-कार अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी 

रत्नागिरीः– साळवी स्टॉप-परटवणे मार्गावरील फिनोलेक्स नजिक वळणावर कारवर दुचाकी आदळुन झालेल्या अपघातात प्रथमेश संजय घाग (रा.सावर्डे, मुळ मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

प्रथमेश घाग हा आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच ०८ ए एम ४६९१ घेऊन उद्यमनगरहून परटवणे दिशेला जात होता. यावेळी अमित कोतळकर (रा.कासारवाडी पुणे) हा आपल्या ताब्यातील कार  घेऊन परटवणेहून थिबा पॅलेस येथे जात होता. फिनोलेक्स कॉलनी नजिकच्या वळणावर दुचाकी कारवर आदळली. यावेळी दुचाकीस्वार प्रथमेश घाग हा दुचाकी वरुन उडून कार जवळ पडला होता. यामध्ये त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत प्रथमेश घाग तेथेच पडला होता. यावेळी त्या मार्गावरुन जाणारे अंबरीश अनिल शेंबेकर यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून प्रथमेश घाग याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघात स्थळ  ग्रमीण पोलीसांच्या हद्दीत असल्याने या अपघाताची माहिती ग्रमीण पोलीसांना देण्यात आली होती. अपघात बाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.