कोतवडेतील सेनेसोबतची युती भोवली; भाजप बूथ कमिटी रद्द

रत्नागिरी:- कोतवडे जिल्हा परिषद गटांमधील सर्व बूथ कमिट्या रद्द (विसर्जित) करण्यात आल्या आहेत. तसेच आता नव्याने कोतवडे जिल्हा परिषद गटांमध्ये सर्व बूथ कमिट्या नियुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती रत्नागिरी भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी दिली आहे.

गेल्या महिन्यात कोतवडे येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षाने कोणाशीही युती केली नव्हती. निवडणूक स्वबळावर लढवली होती. तरीही सत्ता स्थापना करताना नेतृत्वाला डावलून युती करण्यात आली होती. आता  तिथल्या सर्व बूथ कमिट्या रद्द केला असून पुन्हा नव्याने कमिटी नेमण्यात येणार असल्याचे मुन्ना चवंडे यांनी जाहीर केले आहे. पुन्हा एकदा शून्यातून भाजप नव्याने सुरवात करणार आहे आणि पुन्हा ताकद निर्माण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.