रनपतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांकडून फिल्डिंग

रत्नागिरी:- सार्वत्रिक निवडणुकीला अवघे 10 महिने शिल्लक असताना स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेनेच्या अनेककांकडून या पदासाठी इच्छा व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या प्रभावी नेत्यांकडे संपर्क साधले जाऊ लागले आहेत. मात्र शिवसेनेेेकडून यावेळी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तरुण आणि सुशिक्षित उमेदवार दिली जाण्याची दाट शक्यता आहे. 

नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे बहुमत आहे. त्यांचे दोन स्वीकृत सदस्य असून त्यांचा कालावधी दीड वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी हे पद वर्ष ते सव्वा वर्षाच्या निश्चित कालावधीसाठी दिले जाते. हा कालावधी संपल्यानंतर त्या स्वीकृत सदस्याने ठरल्याप्रमाणे राजीनामा देणे अपेक्षित असते.

शिवसेनेच्या दोन स्वीकृत सदस्यांचा कालावधी दीड वर्षांपेक्षा अधिक झाल्याने ते दोन्ही सदस्य संघटनेच्या शिस्तीप्रमाणे राजीनामा देण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रिक्त होणार्‍या या दोन पदांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

इच्छूक कार्यकर्ते आपापल्या नेत्यांना भेटून स्वीकृत सदस्य पद मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने नूतन स्वीकृत सदस्यांना प्रत्यक्षात दहा महिन्यापेक्षा कमी कालावधी मिळू शकणार
आहे.