सरपंच निवडीनंतर निघालेल्या मिरवणुकीवरून पन्हळे तर्फे सौंदळमध्ये  राडा

राजापूर:- सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर निघालेल्या मिरवणुकीनंतर दोन गटात जोरदार राडा झाला. मिरवणुकी दरम्यान शिवसेना व गाव पॅनेल अशा दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला.

राड्या दरम्यान झालेल्या हाणामारीत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील पन्हळे तर्फे सौंदळ गावी घडली. शैलेश शामराव कदम (30) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी दोन्ही गटातील 41 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.