लग्नाचे आमिष दाखवत तरुणी सोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- फेसबुकवरुन झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी शारिरीक संबध प्रस्थापित केले.त्यानंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणातील संशयिताला न्यायालयाने गुरुवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.घटना सन 2016 ते सन 2020 या कालावधीत घडली आहे.

करण महेश शेणवी (25,रा.करंजारी संगमेश्वर,रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.त्याच्याविरोधात पिडीत तरुणीने तक्रार दिली आहे.त्यानुसार,2015 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिची करणशी ओळख झाली होती.या ओळखीतून त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर करणने तिला लग्नाचे आमिष दाखवून ठाणे,बांद्रा,गणपतीपुळे,आरोग्य मंदिर,कारवांचीवाडी याठिकाणी तिच्याशी संबंध प्रस्थापित केले.परंतू त्यानंतर करणने पिडीतेशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिने ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली.तक्रारीनुसार ग्रामीण पोलिसांनी करण शेणवीला अटक करुन गुरुवारी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कोठडीत केली आहे.