संगमेश्वर मधील पेट्रोल पंपावर बिबट्याचं दर्शन

संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. मध्यरात्रीच्या वेळेला बिबट्याने रोड क्रॉस करुन पेट्रोल पंपावर प्रवेश केला. तसंच पेट्रोलवरच त्याने एका कुत्र्याचा फडशा पाडला. यावेळी तिथे उपस्थित कर्मचाऱ्याची चांगलीच पाचावर धारण बसली.

सविस्तर घटना अशी की, मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल पंप ओस पडला होता. पंपावर कसलीही गर्दी नव्हती. त्याचवेळी बिबट्याने मुंबई गोवा हायवे ओलांडून पंपावर प्रवेश केला. आजूबाजूला थोडसं निरीक्षण करुन झाल्यावर बिबट्याला कुत्रं निदर्शनास पडलं. मग झालं तर बिबट्याने कुत्र्यावर झडप मारली.

बिबट्याने जशी कुत्र्यावर झडप मारली तसा कुत्र्याने मोठ्याने आवाज केला. या आजावाने पेट्रोल पंपावर उपस्थित कर्चचारी झोपेतून जागा झाला. त्याने बिबट्याचा हा थरार पाहिला. मात्र पुढच्या काही क्षणांत बिबट्याने पेट्रोल पंपावरुन धूम ठोकली. यावेळी कर्मचाऱ्याची मात्र चांगलीच पाचावर धारण बसली होती.