कोतवडे ग्रामपंचायतीमध्ये सेना-भाजप युतीची मुहूर्तमेढ

रत्नागिरी:- तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंच निवड प्रक्रिया मंगळवार पासून सुरू झाली. तालुक्यातील बहुचर्चित कोतवडे ग्रामपंचायतीमध्ये सेना आणि भाजप युती झाली आहे. पहिल्या दीड वर्षांकरिता सेनेचा सरपंच कोतवडे ग्रामपंचायतीमध्ये विराजमान झाला आहे.
 

तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायती मध्ये सेना भाजपला काठावरचे बहुमत मिळाले होते. 11 पैकी 5 जागा भाजप तर पाच जागा सेनेला मिळाल्या होत्या तर 1 जागी अपक्ष निवडून आला. अपक्ष उमेदवाराच्या हाती सत्तेच्या चाव्या जाण्याची शक्यता असताना या ठिकाणी शेवटच्या क्षणी सेना आणि भाजप युती झाली आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत सरपंच पदाचे सूत्र ठरवण्यात आले. पहिल्या दीड वर्षासाठी सेनेचा सरपंच असणार आहे.