राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची निवड

अध्यक्षपदी राजन मलुष्टे, उपाध्यक्षपदी वीरेंद्र वणजु तर सचिवपदी मकरंद खातू

रत्नागिरी:- राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी १० वाजता श्री राधाकृष्ण मंदिरात पार पडली. या सभेत संस्थेची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. 
अपेक्षेप्रमाणे हि सभा वादळी ठरली. कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असा रेटा अनेक समाजबांधवांनी लावून धरला होता. या मागणीला न्याय देत आज या कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी राजन मलुष्टे यांची पुनर्निवड करण्यात आली. मागील कार्यकाळात संस्थेला योग्य दिशा देण्यात व समाजबांधवांची मोट बांधण्यात राजन मलुष्टे यांचा मोठा पुढाकार होता. नव्या दमाचे उपाध्यक्ष म्हणून रत्नागिरीतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विरेंद्र वणजु व संस्थेच्या महत्वाच्या सचिवपदी संस्थेसाठी अहोरात्र झटणारे मकरंद खातू यांची निवड करण्यात आली. सह सचिवपदी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध कर सल्लागार अॅड. निलेश भिंगार्डे तर खजिनदारपदी प्रख्यात हॉटेल व्यवसायिक राजेश रेडीज यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या समितीवर सदस्य म्हणून पाच जणांची निवड करण्यात आली असून त्यात सुप्रसिद्ध वकील सिद्धार्थ बेंडके, सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक राजेश शेट्ये, उद्योजक रोहित संसारे, समीर रेडीज व नागानंद जागुष्टे यांचा समावेश करण्यात आला आहे. तर संस्थेच्या विश्वस्तपदी श्री. विलास उर्फ बंधू मलुष्टे यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या नवीन कार्यकारणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सभेला मोठ्या संखेने वैश्य समाजबांधव उपस्थित होते.