रत्नागिरी जिल्ह्यात 21 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह

रत्नागिरी:- शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 21 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सर्वाधिक 12 पॉझिटिव्ह शिक्षक संगमेश्वर तालुक्यात सापडले आहेत. 
 

21 पॉझिटिव्ह शिक्षकांमध्ये खेड येथे 2, संगमेश्वरला 12, रत्नागिरी 2, लांजा 1 आणि राजापूरात 4 कोरोना पॉझिटव्ह रूग्णांचा समावेश आहे. 

बंद असलेल्या टप्प्याटप्प्याने सुरू व्हाव्यात यासाठी शासनाने त्याबाबतचे नियोजन करून २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर होताच शिक्षण विभागानेदेखील योग्य ती खबरदारी घेतली आहे. सर्व शाळांचे निर्जंतुकीकरणाचे काम सुरू झाले असून शाळेत विद्यार्थ्यांना मास्क उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.