कुवारबाव येथे प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव येथे प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 26 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास उघडकीस आली असून शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिलिंद यशवंत कांबळे (45,रा.अष्टविनायक सोसायटी कुवारबाव, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.याबाबत त्याचा भाउ राहुल यशवंत कांबळे (42,रा. अष्टविनायक सोसायटी कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी मिलिंद कांबळे घरातील रुममध्ये पेपर वाचत बसले होते. काही वेळाने राहुल यांची मुलगी स्वरा ही खेळणी आणण्यासाठी त्यांच्या रुममध्ये गेली होती. परंतू रुमचा पुढील बाजुचा दरवाजा बंद होता. म्हणून ती मागील बाजुच्या दरवाजाने रुममध्ये गेली असता रुमचा लाईट बंद होता.तसेच तिला मिलिंद काका उभ्या अवस्थेत दिसून आला.

तिने ही बाब आपल्या वडिलांना म्हणजेच राहुल कांबळे यांना सांगितली. म्हणून ते धावतच मिलिंदच्या रुममध्ये गेले असता त्यांना मिलिंद लोखंडी बारला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. राहुलने तातडीने याची माहिती शहर पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.