रत्नागिरी तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींवर महिला राज 

रत्नागिरी:- मुदत संपून निवडणुक झालेल्या आणि भविष्यात मुदत संपणार्‍या रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत झाली. त्यामध्ये 48 ग्रामपंचायतींवर महिला राज येणार आहे.

येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. तहसिलदार शशिकांत जाधव यांनी चिठ्ठ्या टाकून आरक्षीत ग्रामपंचायतींची नावे जाहीर केली. चिठ्ठ्या काढण्यासाठी स्वरा दाभाडे या मुलीला निमंत्रीत केले होते. कोरोनाचे निकष पाळत ही प्रक्रिया झाली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापतींसह सदस्यांसह अनेक ग्रामपंचायतींचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षणाबाबतची माहिती श्री. जाधव यांनी उपस्थितांना दिली. जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्येक तालुक्यासाठी आरक्षीत जागांचा कोटा निश्‍चित करुन दिलेला होता. त्यानुसार आरंभी अनुसूचित जातीच्या 7 जागांचा निकाल लागला. मागील पाच वर्षात महिला आरक्षण पडलेल्या ग्रामपंचायतींच्या चिठ्ठ्या बाजूला काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनुसूचित जाती महिलांसाठी चारच चिठ्ठ्या शिल्लक राहील्या. इतर मागासवर्गीयसाठी 25 चा कोटा निश्‍चित केलेला होता. त्यामध्ये महिलांसाठी 13 ग्रामपंचायती आरक्षीत झाल्या. शेवटी सर्वसाधारणसाठी 62 जागा निश्‍चित केलेल्या होत्या. त्यातील 31 महिलांसाठी आरक्षीत केल्या गेल्या.

सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही ग्रामपंचायतीमधील उपस्थितांनी प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केल्या. सलग दोन ते तीनवेळा महिला आरक्षण पडल्याचे निदर्शनास आणून दिले; मात्र मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचे तहसिलदार श्री. जाधव यांनी स्पष्ट केेले.

अनुसूचित जाती: वळके, जांभरूण, खरवते
अनुसूचित जाती ( महिला): तोणदे, चाफेरी, उक्षी, पाली
नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र)  महिला ः गणेशगुळ्ये, कर्ला, केल्ये, पूर्णगड, कासारवेली, झरेवाडी, सोमेश्वर, कासारी, पोमेंडी बु., गोळप, फसोप, नांदीवडे, चिंद्रवली
इतर मागास प्रवर्ग ः बोण्डये, गडनरळ, वरवडे, सतकोंडी, टिके, खानु, नाणीज, टेंबे, वेतोशी, खेडशी, मिरजोळे, वाटद
सर्वसाधारण प्रवर्ग ( महिला): चरवेली, आगरनरळ, राई, गुंबद, चांदोर, निवेंडी, साठरे, लाजुळ,
मालगुंड, ओरी, निवळी, मेर्वी, पानवल, मावलंगे, गणपतीपुळये, शिरगाव, वेळवंड, बसणी, कुवारबाव, सडामिर्‍या, कुरतडे, नाखरे, चाफे, कळझोंडी, भोके,  रानपाट, भाट्ये, भगवतीनगर, पावस, करबुडे, निरुळ.
सर्वसाधारण प्रवर्ग: हरचेरी, मजगाव, गावखडी, शिवार आंबेरे, तरवलं, चांदेराई, सैतवडे, विल्ये, देवुड, काळबादेवी, चवे, साखर मोहल्ला, दांडे आडोम, कशेळी, डोरले, कोतवडे, पिरंदवणे, फणसवले, हातखंबा, कोळंबे, मिर्‍या, खालगाव, जांभारी, जयगड, धामणसे, गावडे आंबेरे, पोमेंदीबाखुर्द, रीळ, नेवरे, कापडगाव, नाचणे.