जिल्ह्यात 24 तासात 7 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आणखी दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 1 हजार 368 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात दोघा रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 345 बळी घेतले आहेत.

मागील 24 तासात नव्याने 7 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 470 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 1 हजार 368 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 67 हजार 127 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 20 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने दोघा रुग्णाचा बळी गेला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 345 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 95.36 टक्के आहे.