रत्नागिरी:-तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या जाहीर झालेल्या निकालात शिवसेनेने भाजपला अक्षरशः धुळ चारली. ज्या पद्धतीने भाजपने वातवारण निर्मिती केली होती, तसे कोणतेच चित्र दिसले नाही. उलट भाजपला हक्काच्या ग्रामपंचायती गमवाव्या लागल्या आहेत. 41 पैकी 34 ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्याचा दावा सेनेने केला आहे. तर गावपॅनेल पाच आणि भाजपला अवघ्या 2 ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचयात निवडणुकीत भाजपची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे.
ग्रामपंचयात निवडणुकीला यावेळी प्रचंड महत्त प्राप्त झाले. शिवसेना आणि भाजपने त्यासाठी प्रतिष्ठा पनाला लावली होती. ग्रामपंचायत निवडणुकीला यावेळी मोठ्या सभा आणि मेळावे झाले.
रत्नागिरी तालुका सेनेचा बालेकिल्ला आहे. त्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. त्यासाठी भाजपचे दिग्गज ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले होते. त्यामुळे सेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यासह, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आणि सर्व संघटना ताकदीने वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कामाला लागले होती. आज जाहीर झालेल्या निकालामध्ये तालुक्यावर सेनेची मजबूत पकड असल्याचे पुन्ही सिद्ध झाले आहे.
सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत निकाल जाहीर झाले. सुरवातीपासूनच शिवसेना पुरस्कृत गावपॅनेलचे वर्चस्व दिसत होते. ओरी ग्रामपंचायतीवर वैभव देसाई यांच्या गावपॅनेलच्या सर्वच्या सर्व 7 जागांवर विजयी झाले. कर्लामध्ये 13 पैकी 11 सेना पुरस्कृत पॅनेल उर्वरित 2 भाजप, कळझोंडी नऊ जागांपैकी 8 शिवसेना, 1 भाजप, कशेळी पाच पैकी पाच शिवसेनास, काळबादेवी एकुण 9 जागा. त्यापैकी शिवसेना पुरस्कृत 3, गावपॅनेल 4 आणि भाजप 2 जागांवर वियजी झाले. त्यापैकी एका जागेला समान मते पडल्याने ती टॉसवर ही जागा भाजपला मिळाली.
पाली सर्व 11 जागा शिवसेनेच्या, कासारी , कोतवडे शिवसेना भाजप प्रत्येकी पाच आणि समविचारी 1 जागा मिळाली. कोळंबे आठ शिवसेना 1 गावपॅनेल, खानू एकुण 9 जागांपैकी सात शिवसेना आणि 2 गावपॅनेल, खेडशी, गडनरळ पाच शिवसेना 4 गावपॅनेल, गणपतीपुळे पाच शिवसेेना दोन फाटक गावपॅनेल, गावखडी अकरा जागंपैकी 8 शिवसेना पुरस्कृत तर गावपॅनेल 3, गुंदब सातपैकी 4 बिनविरोध, 3 शिवसेना. गोळप पंधरा जागांपैकी शिवसेना पुरस्कृत 13, गावपॅनेल 2, चांदेराई सात जागांपैकी 5 सेना तर 2 भाजप. चाफे , डोर्ले कुणबी सेना 4 त भाजप 3 निवडुण आले. दांडेआडोम एकुण 9 पैकी 9 सेना, देवूड, नांदिवडे चार भाजप तर 3 सेना, नाखरे नऊ पैकी नऊ शिवसेना, नाचणे सेना 11 तर 2 भाजप, बसणी 6 सेना, 1 भाजप, नाणीज 6 सेना, 3 गावपॅनेल, नेवरे 8 सेना 3 गावपॅनेल, पावस- 13 पैकी 12 सेना 1 भाजप, भाट्ये- 11 जागांपैकी शिवसेना- 10 भाजप पॅनल – 1, मजगाव- 7 पैकी 7 सेना, मिरजोळे 11 पैकी 11 सेना, मिर्या सेना 5, भाजप 4 आणि 2 अपक्ष, राई सातपैकी सात भाजप, हातखंबा- वरवडे 11 पैकी 11 सेना, वाटद- 11 पैकी 7 सेना 4 भाजप, शिवार आंबेरे पाच गावपॅनेल 2 सेना, सडामिर्या 4 भाजप, 1 अपक्ष 2 सेना, सैतवडे- नऊपैकी नऊ सेना, सोमेश्वर 7 गावपॅनेल 4 सेना.