रत्नागिरी:-तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी (ता. 18)जाहीर होणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय भवन येथेच स्ट्रॉग रुम तयार केली आहे. तेथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सीसी टीव्ही आणि पोलिस बंदोबस्तामध्ये सुरक्षित आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. 9 फेर्या होणार असून त्यासाठी 12 टेबल लावण्यात आले आहेत. एकावेळी एका ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण करणार. त्या ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर दुसर्या ग्रामपंचायतीची मोजणी सुरू करण्यात येणार आहे.
तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींच्या मतमोजणी 9 फेर्यांमध्ये होणार आहे. त्यानुसार पहिल्या फेरीत ओरी, कर्ला, कळझोंडी, कशेळी काळबादेवी, पाली. दुसर्या फेरीत कासारी, कोतवडे, कोळंबे, खानू, खेडशी, गडनरळ. तिसरी- गणपतीपुळे गावखडी, गुंदब, गोळप.चौथ्याफेरीत चवे, चांदेराई, चाफे, डोर्ले, दांडेआडोम, देवूड, नांदिवडे. पाचवीफेरी नाखरे, नाचणे, बसणी. सहावी फेरी नाणीज, नेवरे, पावस, भाट्ये.
सातव्या फेरीत मजगाव, मिरजोळे, मिर्या, राई, हातखंबा, आठव्या फेरीत वरवडे, वाटद, शिवार आंबेरे, सडामिर्या, सैतवडे शेवटच्या फेरीत सोमेश्वर ग्रामपंचायत होणार आहे. फेरी संपल्यानंतर उमेदवार व प्रतिनिधींना मतमोजणी कक्षाच्या बाहेर जाण्यास व पुढील फेरीचे उमेदवार, प्रतिनिधी आत येण्यास 5 ते 10 मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे. एका ग्रामपंचायतीचा निकाल लागला की उमेदवार कार्यकर्त्याना बाहेर काढून दुसर्या ग्रामपंचयातीची मतमोजणी घेतली जाणार आहे. दुपारपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल लागण्याची शक्यता आहे.